राजापूर तालुक्यातील पूर्व विभागातील रायपाटण या गावाचे सलग पाच वर्षे बिनविरोध पद्धत्तीने उपसरपंचपद भूषविले तर सध्या दुस-यांदा ते ग्रामपंचायतीत सदस्यपदावर कार्यरत आहेत.
शिक्षण आणि शेती या क्षेत्रात आपले कार्य आणखी ठोस पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी त्यांनी २००९ साली स्वतः पुढाकार घेत आपल्या अध्यक्षतेखाली 'नवजीवन विकास सेवा संस्था' ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली. या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेतर्फे गोवंशसंवर्धन, भाजीपाला पीके, हळद व आले लागवड, दुग्धव्यवसाय, सेंद्रीय व नैसर्गीक शेती, झीरो बजेट शेती, फलोत्पादन, फळप्रक्रिया आदी विषयांवर विविध कार्यशाळांचे आयोजन त्यांनी वेळोवेळी केले.
२०११ साली देशी गायींच्या संदर्भातील लक्षवेधी राज्यस्तरीय गोवंशप्रेमी ग्रामविकास संमेलनही श्री. महेश पळसुलेदेसाई यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून लांजा या गावी आयोजित केले. याप्रसंगी श्री. पोपटराव पवार ( सरपंच हिवरेगाव बाजार जि. अहमदनगर), श्री. सुनील मानसिंहका ( गोवंश अनुसंधान केंद्र देवलापार नागपूर ) आणि श्री. आदीनाथ चव्हाण ( संपादक दै. ऍग्रोवन ) यांचेसह कोकणातील ५ आमदार, आणि राज्यातील असंख्य शेतकरी व गोपालक यांची उपस्थिती लाभली.
प्रो.प्रा. महेश यांनी परिसरातील महिला आणि बेरोजगार यांचेसह नेहमी विविध ठिकाणी कामावर जाणा-या शेतमजूरांचे, कंत्राटदारांचे संघटन करून त्यांना कोकणबाग या संघटनासाठी एकत्र केले आहे.
कोकणातील भाजीपाला ( जसे मुळा, लाल पालाभाजी, भेंडी, मधुमका, चवळी, वाल, पडवळ, दोडका, काकडी, मोहरी, कांदा, कारले अशा नगदी पीके देणा-या भाज्या ) या पीकांचा अभ्यास करून या पीकांतून व्यावसायिक शेती करण्यासाठी काही नमुने तयार केलेले आहेत. फुलशेती यासंदर्भातही महेश यांनी कार्य केलेले आहे.
विदिशा गार्डन्स या स्वतःच्या कोकणबागेतील ग्राहकांच्या संकल्पनेतून व सूचनेनुसार कोकणात स्ट्रॉबेरीची शेती करून स्ट्रॉबेरीच्या पाच प्रकारचे भरघोस उत्पादन घेतले तसेच फलोत्पादन शेतीसुद्धा यशस्वी करीत आंबा, काजू, कोकम, नारळ या पीकांच्या माध्यमातून तयार झालेल्या कोकणमेव्याचे यशस्वी मार्केटींग करीत गिफ्टबॉक्सचा यशस्वी व्यवसाय देखील त्यांनी केला आहे.
महेश यांनी आनंद-संगम आणि ऋत्विक गार्डन्स ही दोन फार्महाऊसेस बांधली आहेत. नियोजन व समन्वयासाठी त्याचा आग्रह असतो तसेच कामगार व्यवस्थापन आणि मनुष्यबळ व्यवस्थापन यात त्यांचे प्रभुत्व आहे. कोकणातील फलोत्पादन, झाडांची कलमांची मशागत याबद्दल त्यांना सखोल माहिती आहे.
अशा या ज्ञानी आणि महत्त्वाकांक्षी महेश पळसुलेदेसाई नामक युवकाच्या कल्पनेतून साकारलेले कोकणबाग एग्रो फार्म्स दिवसागणिक नावारूपाला येत आहे यात नवल ते काय ?
आपल्या स्वप्नांबरोबरच आपल्यासारख्या जगभरातील अन्य महत्त्वाकांक्षी तरूणांची स्वप्न साकार करण्यासाठी महेश कोकणबाग एग्रो फार्म्सच्या माध्यमातून सज्ज झालेले आहेत.
महेश यांच्या या धडपडीला आपलाही पाठींबा लाभेल आणि आपल्या या नात्यातून कोकणातील माती फळेल, फुलेल आणि आपल्याला लाखमोलाचे आशीर्वाद देत तिच्यावर आपली सुखस्वप्ने साकारतील यात आता शंका नाही...