नमस्कार,
आपल्यापैकी प्रत्येकानेच कधी ना कधी एक सुंदर स्वप्न पाहिलेलं असतं. एक छोटासा जमिनीचा तुकडा, स्वतःच्या हक्काचा, त्यावर एक टुमदार घर, घराभोवती नारळीपोफळीची, आंबे फणसांची झाडं नि दूरवर पसरत गेलेलं आपलं स्वतःचं शेत. आपल्या शेतात आपण आपल्याला हवी ती, गरजेनुरूप लागवड करायची आणि त्या धान्यावर सुखाने हक्काचा घास खात आपल्या टुमदार घरात निवांत आयुष्य जगायचं. विशेषतः ज्यांनी आपल्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या निमित्तानी कोकणात प्रवास केला असेल त्यांच्या डोळ्यापुढे तर हमखास हे स्वप्न कधी ना कधी तरळून गेलेलं असतंच !
हेच स्वप्न उराशी बाळगून हल्लीच्या काळात अनेक नवतरूण व तरूणी शेती व बागकामाकडे वळत आहेत. ज्यांच्याकडे वारसा हक्काने लाभलेल्या जमिनी आहेत त्यांना आपल्या जमिनीवर शेती करून पहायचीये आणि ज्यांच्याकडे जमिनी नाहीत पण शेती करण्यात रस आहे अशी अनेक तरूण मंडळी स्वतः धडपड करून शेतीस पोषक अशी जमीन शोधून त्यावर आपले छोटे फार्म हाऊस बांधून तिथे सुशेगाद रहाण्याचं स्वप्न साकारण्यास हल्ली फार मनापासून धडपड करताना दिसू लागली आहेत.
अशा साऱ्या धडपड्या आणि स्वप्नाळू तरूणांची ही शेतीविषयक स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही, कोकणबाग एग्रो फार्म्स पुढे आलो आहोत तुमचे मित्र बनून !
कोकणातल्या कसदार मातीत तुम्हाला जर शेती करायची असेल आणि त्यासाठी अगदी जमीन शोधण्यापासून तुमची सुरुवात असेल तर कोकणबाग एग्रो फार्म्स आहे खास तुमच्याचसाठी !
जगभरातील ग्राहकांना कोकणातील सर्वोत्तम दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे.
कृषी पर्यटन आणि अन्नपदार्थांचे जगभरात वितरण या माध्यमातून कोकणात रोजगार निर्मिती आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण करणे.