सुमारे १० वर्षांचा अनुभव

एका अतिशय वेगळ्या संकल्पनेसह काम करण्यास सुरुवात करून आम्हाला आता तब्बल 10 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. काहीतरी नवं करण्यासाठी, वेगळ्या कल्पना अस्तित्वात आणून त्यांना फलद्रुप करण्यासाठी आम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि कंबर कसून मेहनत करत आहोत. या कल्पनेला मिळणारा अद्भुत प्रतिसाद पाहून आमचा कामाप्रती हुरूप दिवसागणिक वाढतच आहे. कोकणबाग एग्रो फार्म्ससह आजतागायत अनेक लोक या ना त्या रूपाने जोडले गेलेले आहेत याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आमचे या क्षेत्रात असलेले ज्ञान आणि आम्ही कष्टाने कमावलेली विश्वासार्हता. जगभरातील तरूणांकडून आम्हाला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद हे आमच्या कामाच्या उत्कृष्टतेचीच ग्वाही देतात असे या टप्प्यावर म्हणणे योग्यच ठरेल.

आमच्या या कामासाठी आणि आजवरच्या प्रवासात आम्ही गाठलेल्या या एका विशिष्ट टप्प्यासाठी आमच्याजवळ असलेले एकनिष्ठ, प्रामाणिक आणि मेहनती मनुष्यबळ आमच्या पाठीशी आहे. किंबहुना तेच तर आमची खरी संपदा आहेत. आम्ही हाती घेतलेले मोठे कार्य स्वतःच्या खांद्यावर पेलून धरण्यासाठी जी मंडळी सरसावली आहेत त्यांच्यावर आम्ही पूर्णतः विश्वास ठेवून आमचे हे जोखमीचे कार्य लीलया पार पाडत आहोत हे सांगणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.

आम्ही करत असलेल्या कामाचे अनेक पैलू आहेत आणि त्या प्रत्येक पैलूंकरता आम्ही योग्य, विश्वासार्ह आणि जाणकार व्यक्तींकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन आमचे कार्य अव्याहत सुरू ठेवलेले आहे. आमच्याकडे आजतागायत आमच्या कामासंदर्भातील अनेक विशेषज्ञ व संदर्भ व्यक्ती आम्ही जोडलेल्या आहेत. वेळोवेळी त्यांच्याकडून मिळणारे अमूल्य मार्गदर्शन आम्हाला लाखमोलाचे आहे. त्यांच्या आमच्यावरील विश्वासापोटी आम्ही आमची वाटचाल ही कायम प्रगतीपथावर ठेऊ शकू असा आम्हाला दृढ विश्वास आहे.

कोणत्याही कामातील सर्वात जोखमीची बाब असते ती म्हणजे त्यातील आर्थिक बाजू. आमच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या शेतजमीनीत आमची आर्थिक गुंतवणूक ही फार महत्त्वाची बाब येथे अधोरेखित करणे अत्यावश्यक आहे. ग्राहकांकरिता उपलब्ध करून देण्याजोग्या शेतजमीनी स्वतः आधी कोकणबाग एग्रो फार्म्सचे संचालक श्री. महेश पळसुलेदेसाई यांनी नीट पारखून त्यात आधीच अंशतः किंवा जास्तीत जास्त प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून ठेवलेली असते किंवा त्या जमिनींचा विक्रीचा व्यवहार पूर्वनिश्चित करून घेतलेला असतो. त्यामुळे आमच्या ग्राहकाला जेव्हा त्याच्या आवडीची जागा विकत घ्यायची असते तेव्हा त्या जागेविषयीचा व्यवहार निर्धोकपणे पार पडतो. अर्थात्, ज्या जागा कोकणबाग एग्रो फार्म्सकडून विक्रीसाठी प्रदर्शित केल्या जातात त्या जागांबाबत खरेदीचा व्यवहार करताना आमचे ग्राहक तो निर्धोकपणे पूरा करू शकतात.

आमच्या ग्राहकांनी खरेदी केलेल्या किंवा आमच्या बागायतदारांनी पिकवलेल्या शेतमालावर कच्च्या अवस्थेत किंवा मूल्यवर्धित माल उत्पादित झाल्यावर तो माल बाजारपेठेपर्यंत नेणं, बाजारपेठेत तो माल विकून देणे, बाजारपेठेत विकलेल्या मालाची किंमत प्राप्त करून संबंधित बागायतदाराच्या खात्यावर जमा करून देणे, या सर्व कामी आम्ही कार्यरत आहोत. बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज या पद्धतीने हा बाजार आम्ही नियंत्रित करतो. यामुळे आमच्या सन्माननीय बागायतदारांकरवी उत्पादित होणाऱ्या शेतमालाची चांगल्याप्रकारे विक्री करून व्यवस्था लावण्याचं काम आम्ही अनेक वर्ष करत आलेलो आहोत. त्यासाठी आमच्याकडे आमचे काही पूर्वापार ठरलेले ग्राहक आहेत तर काही नवे ग्राहक आहेत. अनेक ग्राहक सतत चौकशी करत असतात. वेगवेगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांशी आमचे चांगले संबंध आहेत तसेच संचालकांनी स्थापन करून नावारूपाला आणलेली एक शेतकरी कंपनीसुद्धा आहे जिच्या माध्यमातून मालाची चांगली विक्री केली जाते.

आम्ही जे कार्य हाती घेतले आहे त्यातील गुंतागुंतीची प्रक्रीया जसे विविध शासकीय नियम, अटी, धोरणे आणि योजना या संबंधीची सखोल माहिती आम्हाला आहे. त्यामुळे विविध शासकीय योजनांचा लाभ आमच्या ग्राहकांना कशाप्रकारे मिळवून देता येईल याबाबातही आम्ही ग्राहकांना संपूर्णतः मदत करतो. तसेच मुळात आमच्याकरवी होणारेही सर्व आर्थिक व जोखमीचे व्यवहार हे योग्य त्या शासकीय नियम व अटींतर्गतच खात्रीशीररित्या पार पडतात. त्यामुळे आमच्याबरोबर जोडले गेलेले आमचे ग्राहक अत्यंत आनंदाने आपले शेजमिनीचे स्वप्न साकारू शकलेले आहेत व भविष्यातही नव्या ग्राहकांना आम्ही हाच आनंददायी सरल अनुभव देण्यास सज्ज आहोत.

Call icon
Whatsapp icon