feature image
feature image
feature image
about

"शेतीला नविन जाग – कोकणबाग"

जमीन मालक तुम्ही व विकासक आम्ही – पैशाला सुगंध मसाल्याचा

नमस्कार,

आपल्यापैकी प्रत्येकानेच कधी ना कधी एक सुंदर स्वप्न पाहिलेलं असतं. एक छोटासा जमिनीचा तुकडा, स्वतःच्या हक्काचा, त्यावर एक टुमदार घर, घराभोवती नारळीपोफळीची, आंबे फणसांची झाडं नि दूरवर पसरत गेलेलं आपलं स्वतःचं शेत. आपल्या शेतात आपण आपल्याला हवी ती, गरजेनुरूप लागवड करायची आणि त्या धान्यावर सुखाने हक्काचा घास खात आपल्या टुमदार घरात निवांत आयुष्य जगायचं. विशेषतः ज्यांनी आपल्या सुरुवातीच्या दिवसांमध्येच कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या निमित्तानी कोकणात प्रवास केला असेल त्यांच्या डोळ्यापुढे तर हमखास हे स्वप्न कधी ना कधी तरळून गेलेलं असतंच !

हेच स्वप्न उराशी बाळगून हल्लीच्या काळात अनेक नवतरूण व तरूणी शेती व बागकामाकडे वळत आहेत. ज्यांच्याकडे वारसा हक्काने लाभलेल्या जमिनी आहेत त्यांना आपल्या जमिनीवर शेती करून पहायचीये आणि ज्यांच्याकडे जमिनी नाहीत पण शेती करण्यात रस आहे अशी अनेक तरूण मंडळी स्वतः धडपड करून शेतीस पोषक अशी जमीन शोधून त्यावर आपले छोटे फार्म हाऊस बांधून तिथे सुशेगाद रहाण्याचं स्वप्न साकारण्यास हल्ली फार मनापासून धडपड करताना दिसू लागली आहेत.

अशा साऱ्या धडपड्या आणि स्वप्नाळू तरूणांची ही शेतीविषयक स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही, कोकणबाग एग्रो फार्म्स पुढे आलो आहोत तुमचे मित्र बनून !

आमच्या सेवा

आम्ही शेतजमीन खरेदी करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना मनाजोगती शेतजमीन वीज, रस्ता, पाणी, लालमाती याच्या उपलब्धतेचा विचार करुन योग्य शेतजमीन मिळवून देतो.
आम्ही शासकीय मान्यताप्राप्त शेतकरी दाखला 7/12 धारक करून देतो.
आर्किटेक्ट, इंजिनियर यांच्या सेवांसह आपणाला आपल्या बजेटप्रमाणे फार्म हाऊस, क्लब हाऊस, शेतघर शेड साकार करून देतो.
शेतीसाठी मशागत, लागवड, रोपे पुरवठा, ठिबक सिंचन, लालचिरा, विहीर बांधकाम यासाठी सर्व प्रकारच्या सेवा पुरवतो.
शासकीय अनुदाने, कृषी कर्ज, प्रकल्प कर्ज, पिक विमा यासाठी सल्ला व सेवा देतो.
आपल्या शेतमालावर अन्नप्रक्रिया, फळ प्रक्रिया करून मार्केटींग व विक्री व्यवस्था देतो.

आम्ही कोण?

  1. तुमच्या शेती करण्याच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणणारे
  2. तुमची शेतजमीन कसणारे नि फुलवणारे
  3. तुमच्यासाठी शेतजमीन खरेदी करण्यापासून ते त्या जमिनीवर कृषी लागवड करण्यापर्यंत आणि त्यापुढेही तुमच्या शेतजमिनीचे पालकत्व घेणारे.

कोकणातल्या कसदार मातीत तुम्हाला जर शेती करायची असेल आणि त्यासाठी अगदी जमीन शोधण्यापासून तुमची सुरुवात असेल तर कोकणबाग एग्रो फार्म्स आहे खास तुमच्याचसाठी !

mango
rice farm
Call icon
Whatsapp icon